"श्रेय लग्नगाठीचे... "
लेखक: दिनेश दिलीपराव तळेकर (धिवोहम)
Fb.me/DineshTalekarActions
अगदी राम सीतेचा जोडा शोभेल अशी गाठ त्या दोघांची जुळली. नक्कीच या लग्नासाठी काही लोकं निमित्त झाली. शेवटी कोणत्याही लौकिक घटने मागे कार्य-कारण नियम हा असतो आणि असायलाही हवा असे अनुभवातून जाणवते.
लग्नानंतर काही महिन्यांनी लग्न जमवनाऱ्यांपैकी एक जण त्यांच्या वैयक्तिक गैरसमजातून मुलीच्या वडिलांना म्हणाले की, " माझ्या मुळेच तुमच्या मुलीला एव्हढं चांगलं स्थळ मिळालं... ".
तेव्हा मुलीचे वडीलही या गोष्टीला दुजोरा देत म्हणाले, " हो नक्कीच, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे जूळून आल्या सगळ्या गोष्टी... ".
तेव्हा नुकतेच मुलाचे मामाही पाठीमागून येतच होते, आणि त्यांनीही हे संभाषण ऐकले.
तेव्हा ते जवळ येऊन स्मित हास्य करत म्हणाले, " तुम्ही दोघेही आपआपल्या जागेवर ठिक आहात, कारण जिथून आपण पाहत असतो आणि जशी आपली दृष्टी असते तसेच आपल्याला दिसत असते. या विषयाकडे पाहत असताना लग्न जुळवणाऱ्यांना किंवा अगदी लग्न लावणाऱ्या पुरोहितांना, मांडव वा मंगल कार्यालय मालकाला वा लग्नासाठी हातभार लावलेल्या कोणालाही असे वाटू शकते की, हे लग्न माझ्यामुळेच झाले. पण सहसा तसे होत नाही, तुरळक लोकं सोडता सगळेच आपल्या कामाशी काम ठेवत असतात.
आणि तुमच्या सारखे मीही श्रेय घेऊ शकतो कारण या प्रक्रियेत मीही तेव्हढाच सहभागी होतो. पण मी श्रेय घेतले तर ते असे होईल की, जणू मी माझ्या शरीराला म्हणतोय बघ मी आज तुला जेवण दिले; मग शरीर ही मला उलट म्हणू शकते की, नको जेऊस तुच भूकेने त्रस्त होशिल. तसेच हे कार्य माझ्या आयुष्याचा एक भाग होते, ते मी कर्तव्य समजुन केले.
पण कधी कधी जसे बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या श्रीमान श्वान यांना वाटत असते की, माझ्या मुळेच बैलगाडी पुढे चालत आहे. पण तो त्यांचा भ्रम असतो. (हे उदाहरण सर्व परिचित व सोपे आहे म्हणून दिलेले आहे, कृपया पुन्हा गैरसमज करून घेऊ नये.)
तर कदाचित काहींना हे वेळेवर कळते किंवा उशीरा कळते, पण आपण फक्त निमित्त आहोत, कदाचित फक्त बासरी आहोत, आपल्यातून संगीत निर्माण करणारा कोणीतरी वेगळाच आहे, किंवा कोणी आहे का नाही तेही माहित नाही, पण आपण मात्र संगीत निर्माण करणारे नक्कीच नाही आहोत, हे ज्याला कळते तो काही प्रमाणात का होईना पण भगवद् - गीतेचा सार जगत आहे असे समजावे.
तर मुळ मुद्दा असा की, लग्न जुळवणारे, लग्न लावणारे, एव्हढंच काय तर मुला मुलीचे घरचे, पै-पाहुणे, मित्र मंडळी हे सर्व त्यांच्या लग्नासाठी निमित्त असू शकतात, पण कोणीही त्यांच्या लग्नाचे श्रेय घेऊ शकत नाही. आणि, "माझ्या मुळेच हे स्थळ मिळाले किंवा मीच सोयरीक आणली किंवा माझ्या मुळेच तुमच्या मुलीचे वा मुलाचे लग्न झाले", असे म्हणणे म्हणजे स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन केल्यासारखे आहे.
"मुला मुलीची लग्नगाठ ही स्वर्गात बांधली जाते", हे माझ्या चिकित्सक बुद्धीला तसे पाहता पटत नाही, पण या माघचा मतितार्थ पटण्यासारखा आहे. होय, त्या दोघांचे प्रारब्ध ठरवत असते की, त्यांच्या लग्नासाठी कोण व्यक्ति निमित्त होणार आहेत. आणि असे अनुभव व अभ्यासातून जाणवत राहते.
पण फक्त प्रारब्धच जबाबदार आहे का? तर नाही. जसे या वर्षी पाऊस चांगला झाला हा आपला किंवा या प्रदेशाचा प्रारब्धिक योग म्हणायला हवा, पण आपण जर नांगरणी, पेरणी असे शेतीविषयक कर्म केले नाही, तर पाऊस असूनही दुष्काळाची झळ आपल्याला बसणार आहे.
म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही. मग ते दोन हात कोणते ज्यांनी कर्मफळापर्यंतची टाळी वाजते? तर प्रारब्ध आणि कर्म यांची सांगड घालून योग्य अनुपात साधला तर कर्म पूर्तिची टाळी वाजत असते.
त्या दोघांनी तुमची निवड केली आहे की, "तुम्ही त्यांच्या लग्नासाठी निमित्त व्हावे म्हणून", हे समजुन घेण्यासारखे आहे. "तर त्या दोघांच्या प्रारब्धाने तुमची निवड केली आहे त्यांचे लग्न जुळवण्यासाठी...". अश्या दृष्टीकोणातून आपण या विषयाकडे पाहू शकतो का? पाहिले तर बऱ्याच गोष्टींची उकल होईल.
म्हणून उलट तुम्हीच त्या दोघांचे व विशेषतः मुलीचे आणि त्या अनुशंगाने त्यांच्या घरच्यांचेही आभार मानले पाहिजे. लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत तुम्ही सहभागी झालात यासाठी तुम्ही पुण्यत्वाचे भागी आहातच परंतू ते तोंडावाटे बोलून दाखवून किंवा त्याचे भांडवल करून त्या सौभाग्याची माती करायला नाही पाहिजे.
"संयोग" किंवा "योगायोग" हा सुद्धा एक नियम आहे, परंतू कार्य-कारण नियम हा "प्रारब्धाकडे" जास्त कल देतो.
पुनर्जन्म आहे की नाही, हे वैज्ञानिक दृष्टीतून ठोस सांगू शकत नाही, परंतू आता पर्यंत जगभरात पुनर्जन्म झाल्याच्या जवळ जवळ २५०० पेक्षा जास्त अधीकृत केसेस आहेत ज्यांवर अनेकांनी शोध केला. अशाच एका केसची शहानिशा करण्यासाठी स्वतः महात्मा गांधीजींनी सुचना केल्या होत्या आणि शांतिदेवी नावाच्या स्त्रीची पुनर्जन्माची ती केस आणि तिने सांगितलेल्या पूर्वजन्मीच्या घटना खऱ्या आढळल्या होत्या.
पण तरीही आपण या सर्व गोष्टी सोडून दिल्या तरी माणूस म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने आपण श्रेय घेण्याची उठाठेव करूच नये आणि एखाद्यावर उपकार करण्याच्या दृष्टीने कुणाला मदत करण्याची भावनाही ठेऊ नये. निस्वार्थ मदत वा कर्तव्य समजून एखाद्याच्या उपयोगी यावे आणि ते "नेकी कर दर्या में डाल" या म्हणी प्रमाणे सोडूनही द्यावे. आपल्या पुण्य कर्माचे व कर्म फळाचे भांडवल कधीच करू नये, असं मला वाटतं.
पण तसचं कुणाला काहीही वाटू शकतं, म्हणून मी म्हणत आहे यासाठी हे खरे मानू नका, तुमच्या अनुभवातून, समजेतून जर तुम्हाला पटलं तरच तुमचा मार्ग बदला, अन्यथा जे चाललय ते चालुद्या, बोलण्यात काही चुकले असेल तर माफ़ करा पण एकदा विचार नक्की करा. आपण मुलीच्या लग्नासाठी स्थळ शोधलय का? की मुलीच्या प्रारब्धाने आपल्याला या शुभ कर्मासाठी निवडलंय? या गोष्टीचा आवर्जून विचार करा.
तुम्हाला दुखवण्यासाठी किंवा मीच कसा योग्य आहे, यासाठी मी तुम्हाला हे बोललो नाही. आणि हे मी बोलण्या पुरते बोलत नाही, कारण काहीजण मन दु:खवतात आणि म्हणतात की माझा तसा हेतु नव्हता, पण मला खरचं तुमचं मन दुःखवायचं नाही, तर मला फक्त तुम्हाला समजावून सांगायचंय की, प्रत्येक विषयाला एक तीसरी बाजूही असते, ती बाजू ना माझी असते ना तुमची असते ना त्यांची असते. ती बाजू माणुसकीची असते, एकत्र एकमेकांसाठी जगण्याची असते, अमृत घेण्याच्या रांगेत उभे असताना दुसऱ्यांसाठी दोन पावलं मागे येण्याची असते. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच...
तुमचे बोलणे सुरू असताना मी योगायोगाने इथे आलो की या मागेही काही कार्य-कारण नियम किंवा कुणाचा प्रारब्ध होता का? हेही अभ्यासण्याजोगे आहे.
तिघेही स्मित हास्य करत एकमेकांना पाहत दुजोरा देतात. तेव्हढ्यात माहेरी आलेली मुलगी तिघांना चहा घेऊन येते. आणि तिघेही गप्पा व चहाचा आनंद घेत नात्यांच्या माणुसकीत व माणुसकीच्या अध्यात्मात हरवून जातात...
😇🙏🏻🌱🌳💐
लेखक: Dinesh Dilip Talekar
Youtube.com/DhivoYoga
युवाशक्ति निर्माण केंद्र
Fb.me/YuvaShaktiNirman
सोशल ऎक्शनिस्ट ऑर्गनायजेशन
Fb.me/SocialActionist1
No comments:
Post a Comment